TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : संगमनेर कारागृहातून पळालेल्या कैद्यांना जळगाव जिल्ह्यातून केली अटक !

कारागृहाचे गज कापून सिनेस्टाईलरित्या केले होते भल्यापहाटे पलायन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी कोठडीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली होती. या कैद्यांना जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळून अहमदनगर एलसीबीच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. या वृत्ताला जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

जामनेर जवळील शेळगावमधील शेतातून केली अटक ; मदत करणारेही ताब्यात !
बलात्कार, खून सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. यातील एका पथकाला फरार कैद्यांची कार जामनेर जवळ खराब झाल्याचे कळाले. यानंतर पथकाने तपासचक्र फिरवीत जामनेरच्या दिशेने प्रवास सुरु केला. पोलिसांना कळाले की,  फरार कैदी जामनेर जवळील शेळगाव शिवारातील एका शेतात लपून बसले आहेत. शेळगाव मधील राजपूत नामक व्यक्तीच्या शेतात चौघं कैदी लपून बसले होते. अहमदनगर पोलिसांचे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास शेळगावमध्ये पोहचले आणि शेताला चौरही बाजूने घेरले. कैद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू शिताफीने त्यांना नगर एलसीबीने ताब्यात घेतले. यावेळी जामनेर पोलिसांनी अहमदनगर एलसीबीच्या पथकाला योग्य ती मदत केली. जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी वृत्ताला दुजोरा देतांना सांगितले की, आज दुपारी नगर पोलिसांच्या पथकाने फरार कैद्यांना अटक केली. स्थानिक पोलिसांना त्यांना सहकार्य केले. तर फरार चारही कैद्यांना मदत करणारे मोहनलाल ताजी भाटी (वडगाव शेरी, पुणे), अल्ताफ असिफ शेख (पुणे) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा वृत्ताला जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. नगर एलसीबीच्या पथकात एपीआय हेमंत थोरात, पीएसआय सोपान गोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

गज कापून केले होते पलायन !

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. बुधवारी पहाटे या कारागृहातील नंबरच्या कोठडीचे गज कापून आरोपींनी पलायन केले होते. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.

चौघांवर गंभीर गुन्हे !
पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे समोर आले होते. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले होते.

हत्यार कसे उपलब्ध झाले?
कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तरीही हत्यार कसे उपलब्ध झाले?,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर द्या : संजय पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपतर्फे नितीन गडकरी यांच्यासाठी “परिवार संवाद” कार्यक्रमाचे आयोजन

April 22, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जानेवारी २०२५

January 5, 2025

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

शेती शिक्षणातूनच भारतीय कृषी अर्थव्यवस्था गतिमान करता येईल : प्रा.डॉ.हरिदास आखरे !

October 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group