TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : जळगावच्या उन्नैस पटेलला ‘PFI’ शी संबंधित गुन्ह्यात नाशिक ‘ATS’ कडून अटक !

४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी ; अटकेतील आरोपींचे मोबाईल संभाषण नष्ट केल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) जळगावच्या एका कार्यकर्त्यांला अटक केली आहे. उन्नैस उमेर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून नाशिकच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईल संभाषण नष्ट करत होता, अशी माहिती एका ATS अधिकाऱ्याने दिली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक पथकाने २२ सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून राज्यभरातून पाच संशयितांना अटक केली आहे. या सदस्यांना २६ दिवस एटीएस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संशयितांनी खबरदारी म्हणून त्यांचा मोबाइल फॉरमॅट करून त्यातील सर्व संवेदनशील माहिती पुसून टाकल्याचे एटीएसच्या लक्षात आले होते. उनैस याने अटकेतील पीएफआय पदाधिकाऱ्यांचे मोबाइल आणि लॅपटॉप फॉरमॅट केल्याचा संशय आहे.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

मोबाइल फॉरमॅट केल्याचे तपासात समोर
संशयितांनी उन्नैस पटेल याची मदत घेऊन त्यांचे मोबाइल फॉरमॅट केल्याचे तपासात समोर आले. याआधी अटक केलेल्या संशयितांपैकी उन्नैसचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उन्नैस कय्युम शेखचा मोबाईल फॉरमॅट करून दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्याचप्रमाणे या संशयितांचा क्रिएटीव्ह माईड्स ग्रुप नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही असल्याचे समोर आले. उन्नैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप आढळून आल्या असून त्यातील संभाषण आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएसच्या पथकाने उन्नैस पटेल याची सुरुवातीस चौकशी करीत पुरावे आढळल्यानंतर त्यास शुक्रवारी (दि.२१) अटक केली. त्याला शनिवारी (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करीत १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्यात संशयित उन्नैस याने संशयितांचा मोबाइल फाॅरमॅट कसा केला, त्यात कोणता डाटा होता, ही माहिती गोळा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने उणेस पटेल यास चार नोव्हेंबर पर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

उनैसच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह संभाषणाच्या दोन ऑडीओ क्लीप सापडल्या
अटकेत असलेल्या सर्वांचाच एटीएसने अतिशय कसून तपास केला आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवणे, राम मंदिराच्या जागी बाबरी मशिद उभारणे असे कारस्थान पीएफआयच्यावतीने रचले जात होते. सध्या अटक केलेल्या उनैस याचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उनैसने कय्युम शेख याचा मोबाईल फॉरमॅट करून दिला. शिवाय या सर्व आरोपींचा क्रिएटीव्ह माईंड्स नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. उनैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप एटीएसला सापडल्या आहेत. या क्लिपमधील संभाषण अतिशय आक्षेपार्ह असल्याचे एटीएसच्या निदर्शनास आले आहे. त्याआधारेच उनैसला अटक करण्यात आली आहे. उनैस याने संशयितांचा मोबाइल का फाॅरमॅट केला, कसा केला, त्यात कोणती संवेदनशील माहिती होती, हे फॉरमॅट करण्यास कुणी सांगितले होते, उनैस कुणाकुणाच्या संपर्कात होता, आदी बाबींची चौकशी सध्या एटीएसकडून केली जात आहे. तसेच नाशिकच्या न्यायालयात हजर केलेल्या संशयिताचे संगणक, मोबाइल, हार्डडिस्क, बँकेचे व्यवहार तपास यंत्रणांकडून तपासण्यात आल्याचे कळते.

 

उनैसवर जळगाव एटीएसकडून सप्टेंबर महिन्यात प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव) याला २७ सप्टेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.

याआधी अटक केलेले पाच संशयित
नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, रा. दोन्ही रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

मोठी बातमी : भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची नव्याने होणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागील भांडण उकरुन काढत हल्ला ; चौघांवर गुन्हा

March 15, 2021

अमृत महोत्सवानिमित्त : शेखुलहिंद शाळेत मुस्लीम मनियार बिरादरीतर्फे गणवेश वाटप

August 21, 2022

हिरेन, वाझे १७ फेब्रुवारीला सीएसएमटीला भेटले होते ; सूत्रांची माहिती

March 19, 2021

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group