मुंबई (वृत्तसंस्था) महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढणार आहे.
राज्यात मुंबईसह सध्या २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाची आजच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊन जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) जोडण्यात यावे असे कोर्टाचे आदेश आहेत. मात्र, नेहमी प्रमाणे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.