छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पिसादेवी परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय शेतकऱ्याचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास घडली. संतोष पाराजी काळे (३९) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कवठचे फळ तोडण्यासाठी झाडवर गेलेल्या संतोष काळे यांचा पाय घसरून डोक्यावर पडल्याने जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तोपर्यंत परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.
संतोष हा सकाळी नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. कौठीच्या झाडावर पिकलेली कवठ तोडण्यासाठी तो झाडावर चढला. फळ अधीक उंचीवर असल्याने संतोष उंच फांदीवर चढत गेला. कवठचे फळ तोडत असतांना त्याचा पाय निसटला व तो सरळ खाली येत दगडावर पडला. दरम्यान या घटनेत संतोषच्या डोक्याला जबर इजा झाली. त्याला तात्काळ नातेवाईक व शेजारील शेतकऱ्यांनी बेशुध्द अवस्थेत तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.