चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्न समारंभातून नवरीचे दागिन्यांसह रोकड व मोबाईल असा सुमारे ६ लाख ८५ हजार रूपये किमतीचा ऐवज लांबवणाऱ्या मध्य प्रदेशातील चोरट्यास चाळीसगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले. ही घटना घाटरोडवरील कमलशांती पॅलेसमध्ये दि.७ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. बालवीर माखन सिसोदीया (कग १९) रा. गुलखेडी, ता.पचोर, जि. राजगड (मध्यप्रदेश), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
अलगद लांबवली पर्स !
लग्न समारंभात वधूच्या आई सरोज देशपांडे यांनी नवरीचे सोन्याचे दागिणे, रोख रुपये व आयफोन १३ हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले होता. त्यांच्याकडून दागिने असलेली पर्स एका टेबलावर ठेवली गेली. देशपांडे ह्या नातेवाईकांना भेटुन ती पर्स घेण्यास गेल्या असता त्याठिकाणी पर्स मिळुन आली नाही. त्यामुळे त्या एकदम घाबरल्या. या पर्समध्ये सुमारे ६ लाख ८५ हजार रूपये किमतीचा ऐवज होता.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन तीन तासांच्या आत केले जेरबंद !
घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. असता स्वतः पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासस्त पीएसआय योगेश माळी, हवालदार दिपक पाटील, नंदु महाजन, अजय पाटील, राहुल सोनवणे, नितीन वाल्हे, विनोद खैरनार, रवींद्र बच्छे, आशुतोष सोनको यांच्या पथकाने चोरट्याचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रस्त्यावर असलेल्या इतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कैमेन्याचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी बायपास रोडवरील फोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह ताब्यात घेतले.
पोलिसांचा केला सत्कार !
चोरट्याने सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याने लग्नात खळबळ उडाली होती. मात्र चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या आत चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा ऐवज जप्त केल्याने सवाँनी सुटकेचा श्वास सोडला. पोलीसांचे कौतुक करून सत्कार केला.