कानपुर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशाच्या कानपुरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलीये. एका दहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. त्या मुलाचे डोळे खिळे ठोकून फोडण्यात आले आहे. एवढेच नाही तर मारेकऱ्याने त्याचा संपूर्ण चेहऱ्याला सिगारेटचे चटके देऊन प्राइवेट पार्टमध्ये (Private Part) काठी घुसवण्यात आली होती शिवाय मानेवर शूजचे निशाण सापडले आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत तपासासाठी टीमचं गठण करण्यात आलं आहे. नर्वलच्या एका गावात राहणारी व्यक्ती व्यवसायाने राजमिस्त्री आहे. १० मुलांमध्ये आठव्या क्रमांकाचा मुलगा पाचवीच्या वर्गात शिकतो. सोमवारी दुपारी तो टायर घेऊन खेळायला शेतात गेला होता. यानंतर त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत त्यांनी पोलिसात माहिती दिली होती. मंगळवारी दुपारी गावातील एक व्यक्ती शेतात गेला तेव्हा मुलाचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत सापडला.
तंत्र-मंत्रानंतर हत्या केल्याची शक्यता
सूचना मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. सूत्रांनी सांगितलं की, मुलाचे डोळे खिळ्याने फोडण्यात आली होती. मानेभोवती शूजचे निशाण होते. पायाने त्याचा गळा दाबवण्यात आल्याची शक्यता आहे. त्याचा संपूर्ण चेहरा सिगारेटने जाळला होता. त्याच्या मृतदेहाशेजारील शेतात त्याचे कपडे आणि टायर सापडलं आहे. टीमला येथील एके ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे दोन ग्लासेस दिसले आहेत. याशिवाय रक्ताने माखलेली काठीही सापडली आहे. त्याच्या डोक्यावरही जबर जखम झाली आहे. मुलाचं लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे. काहींनुसार तंत्र-मंत्रासाठी त्याचा वापर करण्यात आला.