औरंगाबाद (वृत्तसंस्था) हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील देवा नगरी भागात बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नाझीम पठाण राउफ पठाण असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सध्या आयपीएलचा धुमधाम सुरू असून याच सामन्यावर विविध ठिकाणी एजंट नेमून कोट्यवधींचा सट्टा चालविणाऱ्या सट्टा किंग म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या मनोज दगडाला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे.औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत होते. जिन्सी पोलिसांनी गेल्या महिन्यात अशाच एका एजंटला अटक केली होती. त्या नंतर दगडाचे नाव समोर आले होते. तर काची वाड्यातून पिता-पुत्रांना अटक केली होती. तर दोन आठवड्यांपूर्वीच सिटीचौक पोलिसांनी रोजेबाग परिसरात एका फ्लॅटमध्ये छापा मारून आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यासाठी सुरू असलेला कॉल सेंटरवर छापा मारला होता.
विशेष म्हणजे, या ठिकाणी महिला शिक्षिकेला कामावर ठेवण्यात आले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तेंव्हापासून गुन्हे शाखेचे पथक दगडाची चौकशी करीत होते. चौकशी दरम्यान पोलिसांना चकमा देण्यासाठी दगडाने वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि सिमकार्ड हे बनावट कागदपत्रे आधारे घेतल्याचे समोर आले आहे. त्या क्रमांकावरून सट्टा घेतला जात असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी आज दगडाला अटक केली अशी माहिती सूत्रांनी दिली.