जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर भागात संभाजी चौक जवळील के.टी कथुरिया किराणा सुपरशॉपी दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कैलास टेकचंद कथुरिया (वय ७७, रा. १६५, शिवाजी नगर, संभाजी चौक जवळ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. १० मार्च २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जळगाव शहरात शिवाजी नगर भागात संभाजी चौक जवळील के. टी. कथुरीया किराणा सुपरशॉपी दुकानाचे शटरला लावलेले दोन कुलुप तोड्डुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानात ठेवलेला १० किलो ग्रॅम काजू ठेवलेली प्लॅस्टिकची बरणी, ५ लिटर ची इमामी कंपनीची तेलाची कॅन, ५ हजार रुपयांची चिल्लर, २ हजार रुपये किंमतीच्या कॅडबरी, चॉकलेट, आईस्क्रीम फ्रिजमध्ये ठेवलेल्या, प्लस कंपनीच्या पाण्याची बाटली, असा एकूण १४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ भास्कर ठाकरे करीत आहेत.