जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदगाव येथे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून बंद घरातून १० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
अधिक माहिती अशी की, हिम्मत दौलत धनगर ता. नांदगाव ता. जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शेतीचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीने काम करण्यासाठी ते २० डिसेंबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून ते कामावर गेले. घराला कुलूप लावल्याची संधी पाहून अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या दरवाजाचा कुलूप तोडून घरात ठेवलेले १० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हिम्मत धनगर यांच्या फिर्यादीवरून २५ डिसेंबर रोजी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
















