पारोळा (प्रतिनिधी) येथील गंगुबाई नगर आणि श्रीनिवास भाऊ नगर या दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात ललित राजेसिंग राजपूत (वय ४० रा. गंगुबाईनगर पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटमधील ७० हजार रोकड, १५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ हजार रुपये किंमतीची एक १ ग्रॅम वजनाची सोन्याचे पेंडल, ३ हजार रुपये किंमतीच्या दोन १/२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ हजार रुपये किंमतीची १ ग्रॅम सोन्याची नथ, ८ हजार रुपये किंमतीची चांदीचे दागिने तसेच भांडी त्यात साखळ्या व चांदीचे ग्लास वाट्या, असा एकूण १ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घरफोडीबाबत श्रीनिवास भाऊ नगरातील सरोजिनी धर्मा पाटील (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद त्यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटमधील १५ हजार रुपये रोख, १ लाख २८ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व बँकेचे चेकबुक व पासबुक व शैक्षणिक कागदपत्र, असा एकूण १ लाख ४३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रशि. पोउप नि. शेखर डोमाळे हे करीत आहेत. दरम्यान, शहरात सलग दोन घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.