भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगांव येथील एका घराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ६८ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रमेश श्रीधर पाटील (वय ७५, सुनसगांव ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ मार्च २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे कुलुप कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील गोदरेज कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने संमतीवाचुन लबाडीच्या इरादयाने चोरून नेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ युनुस मुसा शेख करीत आहेत.