चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील गरताड येथे रात्रीच्या सुमारास घरफोडी करत सोने चांदीचे दागिने असा २ लाख ८५ हजाराचा ऐवज लांबवल्याची घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गरताड येथील केशरलाल मोतीलाल पाटील(वय ४६) हे शेतीसह खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. १९ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातील सोने व चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम असा तब्बल २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केली आहे. याप्रकरणी केशरलाल पाटील यांनी दि २० रोजी चोपडा शहर पोलीस स्थानक गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी घनश्याम तांबे हे करीत आहेत.