पाचोरा (प्रतिनिधी) येथील दर्शन कॉलनीतील एका घराच्या कम्पाऊंडचे कुलूप तोडून मोटारसायकलसह रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात दिपक रामकृष्ण पाटील (वय ४१, रा. लोणी ता. पारोळा ह.मु. कृष्ण दर्शन कॉलनी पुनगाव रोड प्लॉट नं ३०, पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ मार्च २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कंपाउंडचे कूलूप तोडून व घराचे दरवाजाचे कूलूप व दरवाजा तोडून फीर्यादीचे संमतीवाचून लबाडीच्या ईराद्याने रात्रीचे वेळेस होंडा कंपनीची सीबी साईन मोटार सायकल क्र. एम.एच १९ डी के २९३२, १०,००० रुपये रोख रक्कम, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैन, ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने, असा एकूण एकूण १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून घेवून गेला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ प्रकाश पाटील करीत आहेत.