चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन घरांमध्ये घरफोडी
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कडगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्या. याठिकाणाहून चोरट्यांनी २२ हजाराच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कडगाव येथे किरण मोतीराम पाटील (वय ६३) हे वास्तव्यास आहे. त्यांच्या बंद घराच्यासात हजार रुपये चोरून नेले. याच रात्री गावातीलच विशाल रामदास कोल्हे यांच्या घरातून १० हजार रुपये दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, सहा हजार रुपये किमतीची सोनपोत, रोख किमतीचे सोन्याचे टोंगल व रोख १५ हजार रुपये चोरून नेले.
दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
दि. १६ रोजीच्या रात्री कडगाव येथील सुधाकर रामदास पाटील व रवींद्र श्रीधर पाटील यांच्या बंद घरात मात्र चोरीचा प्रयत्न फसला. या प्रकरणी किरण पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपाटातील १३ तोळे हाती न लागल्याने राहिले सुरक्षीत
चोरट्यांनी किरण पाटील यांच्या घरात चोरी करताना कपाटातील २६ हजाराचे दागिने व रोख सात हजार रुपये चोरले. मात्र त्याच कपाटातील एका कोपऱ्यात ठेवलेले सुमारे १३ तोळे सोने चोरट्यांना मिळून न आल्याने ते सुरक्षित राहिले. घरफोडी झाल्याने सुरुवातीला सर्व दागिने चोरीस गेल्याचे सर्वांना वाटत होते, मात्र कपाटात पाहणी केल्यानंतर त्यांना १३ तोळे सोने मिळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.















