मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण ठाकरे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सरकारसमोर आव्हानं निर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे, मात्र हे सरकार ५ वर्ष पूर्ण चालेल, असं संजय राऊत म्हणाले.
हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असं वाटत होतं त्यानुसार झालं. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चाललं आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, मधला काही काळ संकटाचा होता. उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरी कोणती व्यवस्था असती तर वेगळं काही घडलं नसतं. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण लढाई चांगल्या पद्धतीने हातळली गेली आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन पाहिलं तर त्याचं महत्त्व पटेल. इतर राज्यांमध्ये आपण करत आहोत त्यातील कोणत्याही सुविधा नाहीत. उद्धव ठाकरेंनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना नेतृत्व केलं, म्हणून कमी हानी झाली अन्यथा अराजक माजलं असतं, असं .”
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असं संजय राऊत म्हणाले आहेत. युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर पोटदुखी का होतेय?, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.