कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील सहकार शिक्षण, सामाजिक, राजकिय श्रेत्रातील कणखर व्यक्तीमत्व सहकार महर्षी कै. खंडेराव श्रीपत पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेत सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या हस्ते खंडेराव आबांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पुजन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शालीग्राम श्रीपत पाटील, संचालक जयराम चौधरी, कौतीक पाटील, उत्तमराव पाटील, निंबाजी पाटील, भगतसिंग पाटील, उत्तम मोरे आदी उपास्थित होते. संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी प्रास्तावीक पर भाषणात कै. खंडेराव आबांच्या कार्याची माहिती दिली. आभार मॅनेजर भारत पाटील यांनी मानले. ध खं पाटील शाळेत संस्थेचे ज्येष्ठ संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. आडगाव शाखेवर संस्थेचे संचालक जयराम चौधरी यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक एस एस पाटील यांनी केले. मनोगत पर भाषण मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर तर आभार अभिलाष् महालपुरे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते.