नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळाले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता होत आहे. एकूण ४३ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. या शपथविधीपूर्वी या ४३ नेत्यांशी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत संवाद साधला. सर्व नेत्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे संघटन मंत्री बी. एल. संतोष उपस्थि होते.
शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये १. नारायण राणे,२. सर्वानंद सोनोवाल,३. विरेंद्र कुमार,४. ज्योतिरादित्य शिंदे,५. रामचंद्र प्रसाद सिंह,६. अश्विनी वैष्णव,७. पशुपती कुमार पारस,८. किरेन रिजीजू,९. राज कुमार सिंह,१०. हरदीप सिंग पुरी,११. मुकेश मांडवीय,१२. भुपेंद्र यादव,१३. पुरुषोत्तम रुपाला,१४. जी. कृष्ण रेड्डी,१५. अनुराग सिंह ठाकूर,१६. पंकज चौधरी,१७. अनुप्रिया पटेल,१८. सत्यपाल सिंह बघेल,१९. राजीव चंद्रशेखर,२०. शोभा करंदलजे,२१. भानू प्रताप सिंह वर्मा,२२. दर्शना विक्रम जरदोश,२३. मिनाक्षी लेखी,२४. अन्नपूर्णा देवी,२५. ए. नारायणसामी,२६. कुशाल किशोर,२७. अजय भट्ट,२८. बी. एल. वर्मा,२९. अजय कुमार,३०. चौहान देवुसिन्ह,३१. भगवंत खुबा,३२. कपिल मोरेश्वर पाटील,३३. प्रतिमा भौमिक,३४. सुभाष सरकार,३५. भागवत किशनराव कराड,३६. राजकुमार रंजन सिंह,३७. भारती प्रवीण पवार,३८. बिश्वेश्वर तुडू,३९. शंतनू ठाकूर,४०. मंजुपारा महेंद्रभाई,४१. जॉन बर्ला,४२. मुरूगन,४३. नितीश प्रामाणिक यांचा समावेश आहे.