जळगाव (प्रतिनिधी) 11 जानेवारीपासून महाराष्ट्रात सुरक्षित वाहतूक सप्ताह साजरा केला जाणार असून दिनांक 17 जानेवारीला त्याची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन मार्फत आदर्श स्कूल बस चालक व आदर्श स्कूल बस सहकर्मी (महिला)यांना पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यामधील खाजगी शाळांमधील स्कूलबस वाहन चालक व सहकर्मी यांचा प्रस्ताव संबंधित शाळेने किंवा संस्थेने पाठवणे अपेक्षित आहे. सदर प्रस्ताव संस्थेच्या लेटर पॅड वर पाठवायचा असून शाळेतील उत्तम वाहनचालक उत्तम उत्तम सहकर्मी यांची नावे पाठवावी. सोबत वाहन चालकाचे लायसन्स आवश्यक आहे. सदर प्रस्ताव दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशनच्या गणपती नगर जळगाव येथील कार्यालयात पाठवण्यात याव्या आलेल्या प्रस्तावाची छाननी करून आदर्श स्कूल बस चालक व सहकार्मी निवडले जातील व त्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल अशी माहिती जळगाव मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.