मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे शहरातून प्रचार फेरी निघाली. या प्रचारफेरीला कार्यकर्त्यांसह मतदारांचाही प्रतिसाद मिळाला.
प्रचार फेरी शहराच्या सर्व प्रमुख मार्गांवरून निघाली. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ‘मतदारांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवल्यास पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन मतदारांना दिले. याबाबत विशेषतः स्त्री मतदारांनी आनंद व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत ही प्रचार फेरी मुक्ताईनगर शहरातून सुरू होती.
















