जळगाव ( प्रतिनिधी ) – हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत प्रत्यक्षात केळीची लागवड नसतानाही कागदोपत्री पीक दाखवून शासनाची ७५ कोटी ३९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा नकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील ४२ सीएससी चालकांवर पुन्हे दाखल केले जात आहे. यामध्ये जळगाव तालुक्यातील आठ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध १० कोटी ८८ लाख रूपयांचा फसवणुक करीत असल्याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवामानावर आधारीत फळपीक
विमा योजनेंर्गत केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीमा काढला जातो. जिल्ह्यात ९ हजार ११ विमा अर्जदारांच्या ९०३९.४५ हेक्टर केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. या क्षेत्रावर कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यातील विमा क्षेत्राची पडताळणी केली. या तपासणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवडच झाली नसल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे, २९ हजार शेतकऱ्यांच्या शेतात केळी नसतानाही त्यांचा विमा उतरवण्यात आला असल्याचे उघड झाले होते. तसेच कृषी आयुक्तालयाकडून
एकूण ४८ सीएससी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाले होते, त्यापैकी ४२ जणांवर कारवाई पूर्ण झाली आहे.
आठ सेंटवरुन १० कोटी ८८ लाखांचा काढला वीमा
जिल्ह्यातील ४८ पैकी जळगाव तालुक्यातील भोकर येथील ३, किनोद येथील दोन, सावखेडे बु., भादली खु., कानळदे येथील प्रत्येकी एक असा एकूण ८ सीएससी सेंटवरुन १०.८८ कोटी रुपयांचा केळी पीक विमा काढल्याचे समोर आले आहे.
या सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हे दाखल्
तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर या दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल अशोक पवार, किश् शांताराम सोनवणे, महेंद्र अरुण बडगुजर (तिघ रा. भोकर ता. जळगाव), खुशाल धनराज पाटील, केतन जगदिश सोनवणे (दोघ रा. किनोद, ता. जळगाव), दीपाली प्रकाश पाटील (रा. सावखेडे खु., ता. जळगाव), रविंद्र हरिचंद सपकाळे (रा. भादली खु, ता. जळगाव) व भरत चव्हाण (रा. कानळदे, ता. जळगाव) या आठ सीएस सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ तपास सपोनि अनंत अहिरे हे करीत आहे.















