जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर रस्त्यालगत असलेले विकास दूध बुथ अज्ञात चोरट्यांनी फोडून ८ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
शहरातील धांडे नगरात राहणारे जितेंद्र नारायण प्रजापत यांचे मुख्य पोस्ट ऑफिससमोर विकास दूध बुथ आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून ते नेहमीप्रमाणे घरी गेले. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले. यावेळी त्यांना दरवाज्याचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसून आले. बूथमध्ये गेल्यावर चोरट्यांनी दुकानातून ड्रॉवर फोडून ७ ते ८ हजारांची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. जितेंद्र प्रजापत यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे.