नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ काल (२९ जानेवारीला) स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालंय. विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागलेत. इस्रायलच्या दूतावासाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली.
मध्य दिल्लीतील इस्रायल दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. आता सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रायव्हरच्या साथीनं त्या दोघा संशयितांचं स्केच तयार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोलिसांना बंद पाकीटही आढळलंय, तसेच एक चिठ्ठीसुद्धा सापडलीय. त्या चिठ्ठीत इस्रायली भाषेतून इशारा देण्यात आला आहे, ये तो ट्रेलर है, असा चिठ्ठीत उल्लेख होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून तपास सुरू आहे. दरम्यान या स्फोटावेळची सीसीटीव्ही दृष्य पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. हे दोघंही संशयीत स्फोट घडवण्यासाठी चालत तिकडे गेले होते. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे. बॉम्ब लावल्यानंतर दोन्ही संशयीत तिकडून पळून गेले आहेत. दहशत पसरवण्यासाठी हा बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा विशेष पथकाचा प्राथमिक अंदाज आहे. तसंच स्फोट झाला त्यावेळी परिसरात किती मोबाईल कार्यरत होते, याची माहिती घेण्यासाठी डम्प डेटाही घेतला जात आहे.