कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कोरोना महामारीचे भयानक संकट असल्याने लॉकडाऊन लागलेला आहे. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे कब्रस्तानमध्ये रमजान ईदची नमाज अदा न करता घरीच नमाज अदा करण्यात आली.
गतवर्षीप्रमाणे ईद निरुत्साही ठरली कोणीही नवे कपडे परिधान केले नाही. रोजा इफतारी शीरखुर्मा कार्यक्रम आयोजित केला नाही. कोरोनाच्या संकटाने मुक्ती मिळावी, यासाठी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाजमध्ये अल्लाहची प्रार्थना केली. आपले नातेवाईकांनी व हिंदू मुस्लिम बांधवांनी फोनवर व्हाट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या.