अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत रोहिदास विकास फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरावर चर्मकार समाजाचे बांधवांनी गुगल मिटद्वारे नुकताच साजरा केला. यावेळी महिलांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील घेण्यात आला.
अमळनेरातील समाज बांधवांनी ढेकु रोड फोर्ट परिसरात शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून केक कापून साजरा केला. संत रोहिदास विकास फाऊंडेशनने महाराष्ट्र राज्यात चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी व समाजसेवासाठी एका वर्षात विविध कार्यक्रम घेतले. त्यात प्रामुख्याने जयंती साजरी करणे, समाजातील प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी लढा देणे याचा समावेश आहे.
रविवार सकाळी रोजी संस्थापक अध्यक्षा सुरेखा दिघे यांनी राज्यातील व सर्व राज्यस्तरीय विभागीय जिल्हा तालुका कार्यकारणी पदाधिकारी सभासदांसह गूगल मीटव्दारे संत रोहिदास विकास फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिवस कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन साजरा केला. या कार्यक्रमात शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखाताई दिघे यांनी माडली. तर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शक रामदास भंडारे, शारदा उंबरकर, वंदना वाघ, दिलीप महाले, लक्ष्मण काजळे, इंद्रजीत बनसोडे, अनिता तुपे ॲड. भूषण मराठे, अर्चना वैद्य, रवींद्र खामकर, निवृत्ती दिघे, वंदना नवले, बंडोपंत जेवळीकर, प्रफुल आगवणे, आदीनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजय तुळशीराम मोरे शिक्षण विस्तार अधिकारी चोपडा, प्रभाकर शीरीसागर खान्देश संपर्कप्रमुख, संजय मोरे, या प्रमुख अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन व केक कापून साजरा केला. तसेच प्रमुख अतिथीनी चर्मकार समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा कमल भटा बाविस्कर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन तुपे यांनी मानले.
महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम
अमळनेर शहरातील ढेकु रोड फोर्ट परिसरात संत रोहिदास विकास फाऊंडेशनच्या चर्मकार समाजातील महिला खान्देश अध्यक्षा उषा देवरे, जिल्हा सचिव शारदा उंबरकर, तालुकाध्यक्षा मीना शीरसगार, उपाध्यक्षा सूनीता मोरे, सचिव ज्योती मोरे यांनी वर्धापन दिवसानिमित्त समाजातील महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वान देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा उंबरकर यांनी केले व आभार प्रदर्शन उषा देवरे यांनी मानले.