धरणगाव (प्रतिनिधी) भगवान महावीर यांच्या २६२० जन्मकल्याणक महोत्सव रविवारी घरोघरी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व भाविकांनी आपआपल्या परीने रांगोळी सजवून, घरावर झेंडे लावून, सायंकाळी दिवे लावून तसेच “जियो और जिने दो”, व “त्रिशाला नंदन वीर की, जय बोलो महावीर की” घोषणा देऊन जयघोष करण्यात आला.
सकाळी भ.महावीरांचा अभिषेक मंदिराचे मोजके पदाधिकारी व पुजारीच्याद्वारा मंदिरात करण्यात आला. त्यामध्ये मोहन गांधी, शैलेंद्र जैन, संजीव जैन, शिखरचंद मोतुळे, संतोष सावळकर (पुजारी) तसेच मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन उपस्थित होते. यावर्षीही कोरोनाची महामारी असल्याने सकाळची प्रभातफेरी व सायंकाळची शोभायात्रा सकल जैन समाजातर्फे रद्द करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात राजुलमती महिला मंडळाच्या मोजक्या सदस्यांनी भ. महावीरांचा जन्मोत्सवचा कार्यक्रम केला. तिथे पाळणा हा आकर्षकरितीने सजविण्यात आला होता. त्यानंतर भ. महावीरांचे भजन व आरती करून उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये रिता डहाळे, वैशाली जैन, सुलभा लाड, उषा जैन, आरती जैन, डॉ. पद्मिनी डहाळे, माधुरी जैन, संगीता डहाळे व इंदूबाई मोतुळे उपस्थित होत्या.
तसेच सायंकाळी धरणगाव येथील कामधेनू गोशाळेत गायींना चारा, गूळ तसेच लहान मुलांना मुरमुरे,शेव/चिवडा, बिस्किट पुडे ,याचे वितरण मंदिराचे उपाध्यक्ष प्रतीक जैन यांच्या द्वारे करण्यात आले. त्याठिकाणी अध्यक्ष राहुलभाऊ जैन, श्रेयान्स जैन, सेक्रेटरी, चंदूभाऊ जैन, व सुजित जैन, हे उपस्थित होते. तसेच ऑनलाईन पध्दतीने गुरुमहाराजांनी प्रवचन देऊन भ. महावीरांचा संदेश व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.











