चाळीसगाव (प्रतिनिधी) आज शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी हा दिवस म्हणजे एक उत्सव असतो. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अनेक शिवप्रेमी रायगडावर जाऊन हा दिवस साजरा करतात. मात्र या वर्षी कोरोना परिस्थिती असल्याने रायगडावर प्रतिबंध आहे. चाळीसगाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून किल्ले लळींग येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला.
यावेळी छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांच्या नावाच्या जयघोष घोषणा देण्यात आल्या. आणि किल्ल्यावरील काही प्रमाणातील प्लास्टिक कचरा साफ करण्यात आला. यावेळी किल्ल्यावर असलेल्या इतर पर्यटकांनी या कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, गजानन मोरे, विनोद शिंपी, जितेंद्र वाघ, शुभम चव्हाण, रविंद्र दुसिंग, गणेश पाटील, नाना चौधरी, जितेंद्र वरखेडे, मोहन भोळे, अजय घोरपडे, अक्षय अहिरराव, आतिष कदम, समीर शिंपी, साहील शिंपी, कैलास चौधरी, सुमीत वरखेडे, राज भोळे यांनी भाग घेतला तर धुळे येथील किल्ले लळींग संवर्धन समीतीचे सुरेश भाऊ सुर्यवंशी व देशमुख यांनी किल्ल्यावरील अनेक अवशेष दाखवून या ठिकाणी चालू असलेल्या कामाची माहिती दिली.