TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील २६५ गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील २६५ गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या ५८ कोटी १६ लाख रुपयांच्या निधीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.

पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, डॉ हर्षल माने यांचेसह जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, भविष्यात टंचाई भासणाऱ्या गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी असून या योजना सन २०२४ पर्यंत पूर्ण करावयाच्या असल्याने अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच मंजूर गावांच्या योजनांचे पाण्याचे स्त्रोत काळजीपूर्वक तपासून घ्यावेत. योजनांचे अंदाजपत्रक विहित कालावधीत तयार करण्यात यावेत. अंदाजपत्रकात कोणतीही बाब सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्यात.

जिल्ह्यातील कोणत्याही गावास पाण्याची टंचाई भासू नये याकरीता यापूर्वीच जिल्ह्यातील ८३८ गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आला असून त्याकरीता ९४७ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आता नव्याने २६५ गावांचा समावेश केल्याने जिल्ह्यातील १ हजार १०३ गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत होणार असून याकरीता १ हजार ५ कोटी ८९ लाख रुपयांचा सुधारित आराखडा होणार असल्याने आजच्या बैठकीत या आराखड्यासही मंजूरी देण्यात आली.

नव्याने समावेश केलेल्या २६५ गावांची तालुकानिहाय संख्या

मुक्ताईनगर-१७, अमळनेर-२८, भडगाव-५, भुसावळ-११, बोदवड-१७, चाळीसगाव-१४, चोपडा- ३३, धरणगाव- २१, एरंडोल-१०, जळगाव- ८, जामनेर-२४, पाचोरा-१५, पारोळा-१८, रावेर-३१, यावल-१३ असे एकूण २६५ गावांचा समावेश करण्यात आला असून यात ९८ गावांमध्ये रेट्राफिटींग तर १६७ गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास ५८ कोटी १६ लाख रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील १ हजार १०३ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हैदराबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ; भररस्त्यात तरुणाची हत्या !

May 6, 2022

आमचा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, ठाकरेंचा मेळावा पवार-गांधींच्या मिक्स विचारांचा : ना. गुलाबराव पाटील !

September 20, 2022

अखेर दयानंद चौक खड्डेमुक्त – नगरसेवक जाधव यांच्या प्रयत्नांना यश

October 29, 2020

जुन्या वादातून पाईप कंपनीत तरुणावर धारदार वस्तूने वार

January 8, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group