धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर स्पर्धा व उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी पी. आर. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे पुजन करून अभिवादन केले तसेच विविध ऑनलाईन स्पर्धा व उपक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, एनसीसी ऑफिसर डी.एस. पाटील आणि ज्येष्ठ लिपिक सुरेश ओस्तवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
निबंधस्पर्धा
१) निलेश योगेश पाटील (इ.७वी अ )
२) भूषण यशवंत पाटील (७वीअ)
३) कु.पूर्वा दत्तात्रय केले (८वीब )
४) कु.भाग्यश्री सुभाष सोनवणे (८वी ब )
५) कु.सलोनी गोविंद चव्हाण (८ड)
वक्तृत्वस्पर्धा
१) कु.भाग्यश्री सुभाष सोनवणे (८ब)
२) कु.पूर्वा दत्तात्रय केले (८ब)
चित्रकला/पोस्टर स्पर्धा
१) कु.पूर्वा दत्तात्रय केले (८ब)
२) कु.भाग्यश्री सुभाष सोनवणे (८ब)
३) निराली नितीन चव्हाण(८ड)
हे सर्व उपक्रम समाजमाध्यमात अपलोड करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजन बालभारती अभ्यास गटाचे सदस्य बापू देवराम शिरसाठ, गणेशसिंह सूर्यवंशी आणि सुरेंद्र सोनार यांनी केले. योगेश नाईक आणि मिलिंद हिंगोणेकर यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.