चाळीसगाव (प्रतिनिधी) कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात जणांविरुद्ध गुन्हा !
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्याफिर्यादीवरून १) उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), २) सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), ३) अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), ४) सॅम चव्हाण (रा. हिरापुर), ५) भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव) ६) सुमित भोसले (रा. चाळीसगाव) ७) संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गु.रं.नं ५६/२०२४ भादवि कलम ३०७, १२० (व), १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह शस्त्रअधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते.
अंदाधुंद गोळीबार !
शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे त्यांच्या रेल्वे स्थानकाजवळील नेहमीप्रमाणे बसले होते. सायंकाळी हनुमानवाडीतील कार्यालयात पाच वाजेच्या सुमारास कारमध्ये वाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले. गाडीतून उतरताच ते मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर सहा गोळ्या झाडल्यानंतर हल्लखोर वाहनात बसून पसार झाले.
मोरे यांची प्रकृती गंभीर !
महेंद्र मोरे यांच्या सहकाऱ्यासह त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. मोरे यांच्यावर आठ गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. यात ते गंभीर जखमी झाले. मोरे यांच्या पायाला दोन, दंडाला एक आणि एक गोळी छातीला लागली. शिवाय एक गोळी पोटाला चाटून गेल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक चाळीसगावात मागवण्यात आली आहे.
अजय बैसाणे यांच्यावरही फायरिंग !
हल्लेखोरांनी बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागलेली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले असून मोरे यांच्यावर पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे. तसेच मोरे यांना वाचविण्यासाठी अजय बैसाणे गेले असता त्यांच्यावर देखील फायरींग करुन परीसरात दहशत माजवून ते सर्व हल्लेखोर शेवरलेट बिट्स कपंनीच्या कारमध्ये बसून नारावणवाडी पेट्रोलपंपाच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथक रवाना झाले असून एलसीबी देखील संशयितांचा शोध घेत आहे.