चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव)याने लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. त्यानंतर तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.