चाळीसगाव (प्रतिनिधी) बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लांबविल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुशीलाबाई पाडुरंग पाटील (वय ५५, रा. अलवाडी ता. चाळीसगाव) या दि. २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका बसमध्ये चढत होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. पोत चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच सुशीलाबाई पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सुशीलाबाई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. महेंद्र पाटील हे करीत आहेत.