मुंबई (वृत्तसंस्था) येत्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा तडाखा बसेल. तर, (Nashik) नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, संभाजीनगरात (Sambhaji Nagar) विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Updates ) तर संपूर्ण परिस्थितीमध्ये मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहील. तसेच राज्यात पुढील 4 ते 5 दिवस थंडीचे असतील याबाबतची स्पष्ट माहितीसुद्धा हवामान विभागानं दिली आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचीदेखील चिंता वाढली असून राज्यातील रब्बी पीक अडचणीत आले आहे. विशेषत: रब्बी ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात 50 टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.