जळगाव (प्रतिनिधी) ”चंद्रकांत दादांनी शब्द देताना विचार करायला हवा होता, अथवा त्याचे पालन करावयास हवे होते. मात्र चंद्रकांत दादांनी अनेक वेळा अशा घोषणा केल्या, त्यांची ते अंमलबजावणी करत नाही. यामुळे त्यांची यापुढे विश्वासहर्ता राहीलेली नाही, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते एकनाथरा खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
कोल्हापूरच्या उपनिवडणुकीत चंद्रकात दादा पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द काही क्षणात फिरवला असून भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिलेला हा शब्द इतक्या लवकर फिरवणे याबाबत आश्चर्य वाटत असल्याची टीका खडसे यांनी केली आहे. ”चंद्रकांत दादांनी शब्द देताना विचार करायला हवा होता, अथवा त्याचे पालन करावयास हवे होते. मात्र चंद्रकांत दादांनी अनेक वेळा अशा घोषणा केल्या, त्यांची ते अंमलबजावणी करत नाही. यामुळे त्यांची यापुढे विश्वासहर्ता राहीलेली नाही, अशी टिका देखील एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत दादांवर केली आहे.
कोल्हापूरचा विजय हा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातुन महत्वाचा आणि राजकारणीची भावी दिशा ठरवणारा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात यातून दिसून आले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज खडसेंनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत हिदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला मात्र जनता सुज्ञ होती. भाजप हा हिदुत्वाचा वापर राजकारण आणि निवडणुकांपुरता करतो. त्यामुळेच त्यांचा हा आताताईपणा मतदारांनी नाकारल्याचे मत खडसेंनी व्यक्त केलं.