वरणगाव (प्रतिनिधी) उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीआयडी’चे पथक वरणगाव (Varangaon) येथे आलं होते. चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी संशयित आरोपींच्या शोधार्थ हे पथक वरणगावात आले, मात्र चौकशी करून पथक रिकाम्या हाती माघारी फिरले.
सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेतील २०१३ मधील घोटाळाप्रकरणी बुधवारी (ता. १५) सात संचलकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक करून त्यांना बुलडाणा येथे घेऊन गेले होते. त्यावेळी काही संचालक फरार होण्यात यशस्वी झाले होते. परिणामी फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास ‘सीआयडी’चे अनिल पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात हरी बढे यांना चौकशीसाठी वरणगाव येथे आणले होते. मात्र त्यांना रिकामे हाताने जावे लागले. असे असले तरी महामार्गावरील ढाब्यावर संशयित व पथकातील सदस्यांनी जेवण घेतले व ते पुन्हा बुलडाण्याकडे रवाना झाले.