धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकचे चेअरमन संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.
चांदसर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी बेबाबाई ईश्वर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वार्डनिहाय बिनविरोध सदस्यांची नावे.
वार्ड क्रं १ सदस्य
१) चंद्रकांत वसंतराव साळुंखे
२) अशोक भिला सोनवणे
३) सोनाबाई शरद कोळी
वार्ड क्रं २ सदस्य
१) सौ ललाबाई विष्णु गायकवाड
२) श्री छगन तुकाराम गायकवाड
३) पल्लवी राजु गायकवाड
वार्ड क्रं ३ सदस्य
१) संदिप दिपक चौधरी
२) सौ प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील
३) सौ बेबाबाई रविंद्र सोनवणे
अशा सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच व बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य यांचा गावाच्या वतीने संजय पवार यांनी सत्कार करून गावच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच सर्व चांदसरकरांनी संजय पवार यांचे आभार मानले. तर गावाच्या विकासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द सर्व नव निर्वाचित सदस्य तथा लोकनियुक्त सरपंच यांना संजय पवार यांनी दिला.