परभणी (वृत्तसंस्था) काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खळबळ उडवून दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी, ‘काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही, पण मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री आहे, त्यामुळे निधी मिळवून दिला’, असे चव्हाण यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.