पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया आदी उपस्थित होते.