जळगाव (प्रतिनिधी) सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव तालुक्यातील भोकर येथील दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर येथील दौरा गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी निश्चित करण्यात आला होता. परंतू काही अपरिहार्य कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी दिली असून सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांना माहिती द्यावी,असेही म्हटले आहे.