भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून चित्तरंजन स्वैन यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याआधी ते पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक होते. आलोक सिंह दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर चित्तरंजन स्वैन यांची नियुक्ती झाली आहे.
भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवा १९८९ च्या बॅचचे अधिकारी चित्तरंजन स्वैन यांना विविध क्षेत्रीय रेल्वेमध्ये विविध क्षमतांमध्ये रेल्वे काम करण्याचा अफाट आणि समृद्ध अनुभव आहे. त्यांनी दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय परिचालन व्यवस्थापक, आद्रा विभाग, खुर्दा रोड येथे वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक, ईस्ट कोस्ट रेल्वे, चरक्रधरपूर विभाग, दक्षिण पूर्व रेल्वे आणि बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, उपमुख्य परीचालन व्यवस्थापक (गुड्स), भुवनेश्वर, ईस्ट कोस्ट रेल्वे, मुख्य माल परीचालन व्यवस्थापक, बिलासपूर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मुख्य वाहतूक नियोजन व्यवस्थापक, सिकंदराबाद, दक्षिण मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांसारख्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
ट्रेन परीचालन मधील तज्ज्ञ चित्तरंजन स्वैन यांनी त्यांच्या विशिष्ट कारकिर्दीत जपानमधील प्रवासी व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे आणि चीनमध्ये लांब पल्ल्याच्या परीचालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी जर्मनीमध्ये लॉजिस्टिक मॅनेजमेंट फ्रेट ऑपरेशनचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले आहे.