चोपडा (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान सर्व पंचायत समिती आणि ब्लॉकस्तरावर “मेरी मट्टी मेरा देश” या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सांगता दिल्लीच्या कर्तव्यपथावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातुन नेहरू युवा केंद्र चा प्रतिनिधी परेश सुनील पवार यांच्या द्वारे माती गोळा केली गेली. ही माती एकत्रित करीत एका कलाशातून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून “अमृतवाटिका बाग” तयार केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. देशभरातून ७५०० युवक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
दिनांक ९ ऑगस्ट वार बुधवार रोजी ग्रामपंचायत मामलदे ता.चोपडा यांच्या वतीने जि.प.शाळा आवारात “मेरा माटी मेरा देश” अर्थात “मेरी माटी मेरा देश अभियान” अंतर्गत सकाळी १०.०० वाजता “शीलाफलक” अनावरण व नमन पूजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र सैनिकांना वंदन व वीरांचा सत्कार करण्यात आला. त्यात आकाश सुनील पाटील ह्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हातात माती घेऊन पंचप्राण शपथ घेतली.
शाळा आवारात वृक्षारोपण (वसुंधरा वंदन वृक्ष लागवड) नयना सुनिल पाटील, सरपंच तथा पोलीस पाटील, दिलीप वसंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कलशमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत कलश पूजन भरत इंगळे, माजी संचालक शेतकी संघ तसेच ग्रामपंचायत मामलदे कर्मचारी मंडळ सतीश संतोष पाटील (दूध उत्पादन संघ संचालक) यांच्यासह गावातील ग्रामस्थ प्रसाद लोटन पाटील, गावातील जि.प. शाळा प्राथमिक शिक्षक शिक्षिका व अंगणवाडी, मदतनीस आरोग्य कर्मचारी व इतर वर्ग व येथील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी विद्यार्थी सह कार्यक्रमात सहभागी झाले.