चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील उमर्टी येथील एका प्रौढाने महिलेशी वर्षभरापासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ती महिला गर्भवती राहिली. परंतु, तिचा स्वीकार न करता हा प्रौढ पळून गेला. यामुळे या महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावातील महिलेशी जवळपास वर्षभरापासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ती महिला गर्भवती झाली. यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारल्याने या पीडित महिलेने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पीडित महिलेच्या भावाने तशी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलिसांत उमर्टी येथील शिवदास रायसिंग पावरा (वय ४७) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुरबाई राजेश पावरा (वय ३४) यांना गावातीलच शिवदास रायसिंग पावरा याने आपल्या शेतात कामाला नेत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याशी त्याने वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. यातच हि महिला ७ ते ८ महिन्यांची गर्भवती राहिली. परंतु, तिची जबाबदारी न घेता शिवदास पावरा हा गाव सोडून निघून गेला. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ मंगलसिंग शालुराम बारेला (वय २२, रा. पाणवा ता. राजपूर) याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शिवदास रायसिंग पावरा याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ चे कलम १०८, ६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.