चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड बु. येथे झोक्यात खेळत असताना गळफास लागल्याने १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घटना घडली. हितेश नितीन शिरसाठ असे मृत बालकाचे नाव आहे.
झोका गोल गोल फिरवताना गळफास लागला !
तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील रहिवासी असलेले नितीन देविदास शिरसाठ यांचा मुलगा हितेश हा दुपारी घरात झोक्यावर खेळत होता. झोका गोल गोल फिरवत असताना त्यांच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा गळफास लागला. घराच्यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी चोपड़ा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकुलत्या एक मूलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांचा काळीज चिरणार आक्रोश !
हितेश गाने सातवीची परीक्षा दिली होती. घरात तो एकुलता एक मुलगा होता. घटना घडल्यानंतर आई वडिल व आजी आजोबांनी काळीज चिरणार आक्रोश होता. मृत हितेशचे वडील नितीन हितेशवर दि. १८ रोजी सकाळी नऊ वाजता हातेड बु. गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शिरसाठ हे हातेड येथील पेट्रोल पंपावर कामावर आहेत तर आई शेतात मोल मजुरी करते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण व आजी आजोबा असा परिवार आहे.
थकलेल्या आईला पाणी दिले, नंतर घडलं भयंकर !
घटना घडण्यापूर्वी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हितेशची आई शेतातून काम करून घरी आली. घरी आल्यावर हितेश आईला स्वतःच्या हाताने प्यायला ग्लास भरून पाणी दिले. आई थकलेली असल्याने झोप लागली होती. काही वेळात जाग आल्यानंतर डोळ्यासमोर हितेशच्या गळ्यात दोरी अडकलेली पाहून आईने काळीज चिरणार आक्रोश केला.