चोपडा (प्रतिनिधी) तू २० हजार रुपये दे, अन्यथा तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी मिळाल्यानंतर भेदरलेल्या तरुणाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहीद मुन्ना शेख (वय २०,रा.केजीएन कॉलनी, चोपडा), असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात मयत शाहीदचे वडील मुन्ना लतीफ शेख (वय ५१, रा.चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा मुलगा शाहीद याचे व जरीनाबी सोबत अनैतिक संबधी होते. एकेदिवशी त्याला जरीनाबी मुनसफ शेख, मुनसफ शेख रेतीवले (दोघं रा. चुनारअळी, चोपडा), रुकसानाबी शेख हसन, शेख गुड्डू शेख गुलाब, शेख काल्या शेख गुलाब, वसीम शेख मजीद (तिघं रा. अडावद ता. चोपडा) यांनी चुनारअळी भागात बोलावून २० हजाराची मागणी केली. परंतू शाहीदने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर संशयित आरोपींनी तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करू, अशी धमकी दिली. या भितीपोटी शाहीदने २२ जुलै रोजी संशयित आरोपी मुनसफ शेखच्या घरात विषारी औषधाचे सेवन केले. वरील आरोपीतांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून मुन्ना लतीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.
















