TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळीत सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले ; कोरोना पुन्हा येण्याच्या भीतीने नागरिक धास्तावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in आरोग्य, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (वार्ताहर) सध्या दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढला असून वातावरणात बदल झाल्यामुळे गावात सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक घरांमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून गावात कोरोना परत येतो का ? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. एकूणच सर्दी,खोकला व इतर ताप सदृश्य आजारांनी डोकेवर काढल्याने आरोग्य प्रशासना समोर सुद्धा मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गावात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच -सात दिवसांपूर्वी परिसरातली थंडी अचानक गायब झालेली होती व वातावरण उबदार बनले होते. त्यानंतर थंडीने अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहे. गावात अनेक घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून आलेले आहेत. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी दवाखान्यात उपचार करीत आहे. जर का एखाद्याचा ताप कमी होत नसल्यास अथवा खोकल्याचा त्रास जास्त जाणवत असल्यास ते रुग्ण बाहेर गावी जाऊन उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे गावात अधून- मधून टायफाईड, मलेरिया व इतर सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांना खोकल्या चा त्रास खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक प्रकारचे औषधे घेऊन सुद्धा त्यांच्या खोकल्याचा ‘ जिवघेणा ‘ त्रास कमी होत नसल्याने त्यांना आरोग्याची चिंता वाटत आहे.
राज्यातील इतर भागातील कोरोनाची वाढती संख्या पाहता आपल्या गावातही कोरोना पुन्हा शिरकाव करतो की काय ? अशी नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. जून व जुलै दरम्यान गावात कोरोनाचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेले होते, तेव्हा ऊनही चांगलेच तापत होते व नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली होती. त्यादरम्यान गावातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. मात्र, आता या थंडीच्या काळात जर नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास कोरोनाने ‘डोके ‘ वर काढले तर परिस्थिती फार भयावह होऊ शकते, असेही आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावात कोरोना एकदाचा पुर्ण गेला या भावनेतून लोक विना मास्क बाहेर फिरतांना दिसत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार धोकेदायक बनली आहे .तेव्हा नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

 

नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचेच : डॉ.सागर पाटील

गाव परिसराचा सध्या थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे तापअदृश्य सह इतर आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केलेली असून त्यापाठोपाठ कोरोना चा संसर्ग फैलू शकतो .त्याकरता नागरिकांनी बाहेर जातांना तोंडाला मास्क लावणे महत्वाचे आहे.त्यासोबत गरम पाणी व रोगप्रतिकारक काढा घेणे गरजेचे आहे .त्याचप्रमाणे मोठ्या शहरांकडे येणे-जाणे टाळावे .शक्यतो प्रवास करणे ही टाळावे.तसेच थंडी, ताप, खोकला यावर वेळीच उपचार करणेही गरजेचे आहे, असे साकळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
Next Post

प्रताप सरनाईक साधू संत नाहीत : नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर !

May 5, 2024

“अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की…,” केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र पंतप्रधान मोदींनी केलं ट्वीट

December 18, 2020

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

July 12, 2023

पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी दोन एकर जमीन उपलब्ध करून द्यावी : उदय सामंत

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group