बोदवड (प्रतिनिधी) शहरातील उर्दू शाळेजवळ बजरंग पुरा या सार्वजनिक ठिकाणी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महिलांच्या दोन गटात वाद झाले. त्यात जोरजोराने आरडाओरडा करून एकमेकांना शिवीगाळ व मारहाण झाली. आठ ते दहा महिलांमध्ये हा वाद झाला.
याप्रकरणी महिला पोलिस रूपाली डांगे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात महिलांच्या दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सुनंदा गोंधळी, सुशीलाबाई माळी, सविता माळी, रुखमाबाई माळी, गायत्रीबाई माळी, सम्रुद्दीन शेख यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही), निलोफर अन्सार मण्यार, शबाना अन्सार मन्यार व इतरांवर भादवि कलम१६० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुधाकर शेजोळे हे करत आहेत.
















