धरणगाव (प्रतिनिधी) जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी धरणगाव पालिकेचे सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने याबाबत नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
राज्य सरकारी, निम सरकारी,जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या संपात जळगाव जिल्ह्यातील हजारो कर्मचारी देखील संपावर आहेत. वारंवार मागणी करूनही शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. सरकारकडून मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, सहकार, कारागृह, आरोग्य, साखर संकुल, जिल्हा परिषद, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग, भूमी अभिलेख, पालिका, शिक्षक शिक्षकेतर, नगरपालिका, आरटीओ , आशा वर्कर्स आदींसह विविध विभागातील कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
धरणगाव पालिकेचे सफाई कर्मचारी देखील संपावर गेले असून नुकतेच त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले. यः निवेदनावर गोवर्धन सोनवणे, संदीप करोसिया, सुजित वाघरे, रसिकलाल पचेरवार, विजय पचेरवार, विशाल पचेरवार,शेख असिफ शेख गुलाब, असून वाघरे, अस्लम मेहतर, सुकदेव पचेरवार, इतवारी पचेरवार, उमेश चंडाळे, प्रवीण पचेरवार, सुखदेव वाघरे, गणेश करोसिया, अविनाश पचेरवार, सुरज नकवाल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.















