नांदेड (वृत्तसंस्था) रस्ते कामांची निविदा मंजूर करण्यासाठी नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत (५२) आणि वरिष्ठ लिपिक विनोद केशवराव कंधारे (४७) यांना पावणेसात लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी मध्यरात्री एसीबीने ही कारवाई केली. राजपूत यांचे घर व कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयातील कपाटात ४८ लाख, तर घरात २४ लाख ९१ हजार ४९० असे एकूण ७२ लाख ९१ हजार ४९० रुपयांची रोकड सापडली.
नेमकं काय आहे प्रकरण !
तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड (ता. हदगाव, जि. नांदेड) या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले आहे. या कामाच्या निविदा स्वीकृतीच्या शिफारसीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांना भेटले असता, त्यांनी मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण १४ कोटी १० लाख रूपयाचे अर्धा टक्के रक्कम असे सरसकट ७ लाख रूपयाची मागणी केली. यानंतर मुख्य अभियंत्याकडे शिफारस करतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी संबंधीत टेबलचे लिपिक विनोद असता त्यांनी त्यांचे त्यांचेसोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे २५ हजार रूपये असे एकुण ५० हजार रूपयाची मागणी केली.
नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार !
लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार दिली. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी व दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले. तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपूत, (वय ५४ वर्षे, पद अधीक्षक अभियंता (वर्ग-१) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड ) यांची भेट घेत ७ लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा, अशी विनंती केली. अधीक्षक अभियंता राजपूत यांनी तडजोडीअंती पंचांच्या समक्ष ६ लाखांची मागणी केली. तसेच पैसे कंधारे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधित लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपूत यांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेन्डरचे प्रत्येकी २० हजार रुपये असे एकुण ६ लाख ४० हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचासमक्ष होकार दर्शविला.
पंचासमक्ष ६ लाख ४० हजार लाच स्विकारली !
दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून ६ लाख अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपुत यांच्यासाठी व वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे ४० हजार रूपये असे एकुण ६ लाख ४० हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान अधीक्षक अभियंता वर्ग १ गजेंद्र राजपूत यांचे कार्यालय व घर झडतीतून लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचासमक्ष एकूण ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये जप्त केले आहेत. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असुन पो. स्टे. शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करत आला आहे.
तीन पथकांनी रचला सापळा !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन पथकांनी हा सापळा रचला. यात दीन डीवायएसपी चार पोलिस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कामासाठी हिंगोली येथील एसीबीच्या कर्मचान्यांची मदत घेण्यात आली. बुधवारी रात्री आठ वाजता कारवाईला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे तीनपर्यंत सुरू होती. तथापि पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकायांना प्रथमच दोन मशीनचा वापर करावा लागला. यानंतर पती संभाजीनगर व वैजापूर येथील आरोपीचीही झडती घेण्यात आली
पथकात यांचा होता समावेश !
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक गजानन बोडके, सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, सहकारी ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, चापोह शेख अकबर, पोलीस नायक राजेश राठोड, अरशद खान, ईश्वर जाधव, चापोना गजानन राउत, प्रकाश मामुलवार यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी अधिक तपास करीत आहे.