TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव तालुक्यातीलही पदाधिकार्‍यांचे राजीनामासत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरू झाले असून त्यांना वाढता पाठींबा मिळू लागला आहे. काल धरणगावातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज जळगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांनीही हाच कित्ता गिरवत गुलाबभाऊंच्या पाठीशी राहण्याचा खंबीर निर्धार केला आहे.

तालुक्यातील ६० पेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना सुपुर्द करून शिंदे गटात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. यात जिल्हा परिषद गट स्तरीय, पंचायत समिती गण स्तरीय तसेच विविध लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार गुलाबराव पाटील यांच्या सोबत बहुतांश पदाधिकारी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद आता जिल्ह्यात व तालुक्यात देखील उमटू लागले आहेत. शिवसेनेविरोधात उठाव करत, ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांच्या समर्थनार्थ सेनेचे पदाधिकारी उतरत आहे. जळगाव ग्रामीणमधील धरणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यानंतर आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या ६० हून अधिक पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पदाधिकारी पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे देत, माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आपला पाठींबा दिला आहे. यामध्ये उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे यांचाही समावेश आहे. जळगाव ग्रामीणमधील प्रमुख गावांच्या सरपंच, उपसरपंचांनी देखील गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

आज शहरातील अजिंठा विश्रामगृहात विष्णू भंगाळे यांच्याकडे या पदाधिकार्‍यांनी आपापले राजीनामा सुपुर्द केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असल्याने आमदार गुलाबरावजी पाटील यांनी त्यांची साथ घेतली आहे. तर आम्ही गुलाबभाऊंचे कट्टर समर्थक असून त्यांच्या पाठोपाठ आम्ही देखील शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जय भवानी, जय शिवाजी; एकनाथ शिंदे साहेबांचे विजय असो, गुलाबभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

दरम्यान, धरणगाव तालुक्याच्या पाठोपाठ जळगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देत आमदार गुलाबराव पाटील आणि पर्यायाने शिंदे गटाला पाठींबा दर्शविला आहे. तर, तालुका कार्यकारणीतील जवळ-जवळ सर्वच पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपविले असल्याने, जळगाव तालुक्यातील शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांनी देखील यावेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि.प.चे. माजी सदस्य पवन सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.कमलाकर पाटील, जनार्दन कोळी-पाटील, तालुका उपप्रमुख धोंडू जगताप, रमेश पाटील, रवी कापडणे, पी.के.पाटील, सुनील बडगुजर, अर्जुन पाटील, संदीप सुरळकर, तरसोदचे पंकज पाटील, सुनील मराठे, अनिल कोळी, हितेश आगीवाल, विजय आमले, संदीप सोनवणे, विजय सपकाळे, गजानन जगदाडे, नितीन ठामरे, सतीश चौधरी, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

बस अपघातावर आ. गुलाबराव पाटील यांचे लक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला त्यांना कसं पाठीशी घातलं, सगळे डिटेल्स देतो : अण्णा हजारे

January 31, 2021

जळगावात मोबाईलवर बोलण्यात मग्न असतांना रेल्वेखाली आल्यानं तरुणाचा अंत

January 2, 2021

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

December 13, 2025

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी विधवा महिलांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय : डी. जी. पाटील

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group