फैजपूर (प्रतिनिधी) शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचेशी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जयंत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नुकतेच त्यांचे पत्र मिळाले. त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणीमध्ये रू. १४० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे.
सदर निधीमुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल, असे आमदार कार्यालयाने कळविले आहे. या निधीबद्दल आ. चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदा पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.