मुंबई (वृत्तसंस्था) मातोश्रीबाहेर आणि राणा कुटुंबीयांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. त्यानंतर, राणा दाम्पत्याने आज माघार घेतल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि सोशल मीडिया फेम शिवसैनिक नितीन नांदगावकर हेही रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलोय. त्यांची हिंमत होणार नाही, पण हिंमत झाली तर त्यांचं जोरात स्वागत करू, असा इशाराच नांदगावकर यांनी दिला आहे.
“मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा विचार त्यांनी करायला हवा, कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, त्यासाठीच इथे बसलोय,” असे म्हणत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राणा दाम्पत्यास आव्हान दिलं आहे.
तुम्ही आमच्यासाठी मातोश्रीच्याबद्दल बोलून दिल्लीकरांना खुश करण्याचं काम ते करत आहेत. मातोश्रीचं नावं घेतलं की दिल्लीकरांकडून संरक्षण आणि प्रसिद्धी त्यांना मिळते हे माहिती असल्यानेच हा स्टंट सुरू आहे. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलोय. त्यांची हिंमत होणार नाही, पण हिंमत झाली तर त्यांचं जोरात स्वागत करू, असा इशाराच शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी दिला आहे.
आज माघार, उद्या जाणार?
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचा दुजोरा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी मातोश्रीवर येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज ते घराबाहेरही निघू शकले नाहीत. आता, उद्या मातोश्रीवर येणार असल्याची घोषणा त्यांनी केल्याचं समजतंय, असे वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.